तुझी कल्पना ....
समुद्रकिनारी जेव्हा वाळूवर पाय ठेवशील
नेमका त्याच क्षणी मी तुझा हात धरून म्हणेन ..
चल ना आपण पाण्यात उभे राहूया .... ?
बघ तेव्हा नेमके तुलाही असेच वाटेल ...
नजरेला भिडेल ना जेव्हा नजर तेव्हा साऱ्या जगाचा विसर पडेल ,
मग तिथेच वाळूवर बस तू , अन मी तुझ्या मांडीवर डोके ठेवून ..
अनेक वर्षांचे राहिलेले संवाद आपल्या नजरेने मांडेन..
आणि मग काही क्षण चांदण्याच्या बरसातीने तुला तृप्त करेन ..
तुला लाजताना पाहून मग मी ही मनोमन सुखावेन ..
ह्यालाच म्हणतात ना प्रेम असे हळूच कानात कुजबुजेन..
तू हातानी झाकून घेतलेला चंद्र हळूच पहायचा प्रयत्न करेन ..
आणि पुढे काय घडेल या फक्त विचाराने शहारेन..
तू ही मग माझ्या खांद्यावर डोके ठेवशील अलगदपणे ,
आपल्या दोघांचे हात एकमेकात गुंफले जातील नकळतपणे ,
जन्मजन्मांतरीचे नाते असेच उलगडत जाईल हळुवारपणे ,
आणि जीवनाला एक नवा अर्थ प्राप्त होईल फक्त... तुझ्याच स्पर्शाने ...
Shubhangi Sawant
06/09/2012