Wednesday, July 13, 2011

निळी निळी शाई...

निळी निळी शाई.. हात रंगवून जाई..

तेव्हा मात्र मला तिचीच आठवण येई ..



गोरी,गोंडस,गोबऱ्या गालाची..

अगदी माझ्या बाजूला बसायची...

लिहिता लिहिता नेहमी हातावर माझेच नाव लिहायची..



निळी निळी शाई.. हात रंगवून जाई..

तेव्हा मात्र मला तिचीच आठवण येई ..



कडक इस्त्रीचे कपडे घालून ..

दोन वेण्या छानदार घालून ..

चालायची नेहमी मानेला लटका झटका देऊन..



निळी निळी शाई.. हात रंगवून जाई..

तेव्हा मात्र मला तिचीच आठवण येई ..



सवय होती तिला हसायची..

नेमकी त्याचीच भुरळ पडायची ..

काय माहित ती सुध्धा का माझ्यावर मरायची..??



निळी निळी शाई.. हात रंगवून जाई..

तेव्हा मात्र मला तिचीच आठवण येई ..



शाळा संपली आणि लक्षात आले..

भेट आता कधी व्हायची नाही..

जाता जाता म्हणाली मनावर नाव गोंदले आहे ...

हातावरचे पुसून जाईल ...



निळी निळी शाई.. हात रंगवून जाईल ..

तेव्हा मात्र मला तुझीच आठवण येईल ..





---------शुभांगी...०१/११/०९

No comments:

Post a Comment