Thursday, August 19, 2010

तू नसल्यावर

तू नसल्यावर
माझे येणे होत नाही,
तू असताना
ओठांत शब्द येत
नाहीत!
----------------शुभांगी...१८/०८/१०

Friday, July 16, 2010

पाउस ..

हुंदडणाऱ्या मनाला,
देहाची साथ मिळाली,
आणि पावसाने
रोमारोमातून रांगोळी काढली !!

----------शुभांगी...१६/०७/१०

Tuesday, July 6, 2010

असाच एक दिवस

असाच एक दिवस यावा,
रिकामा वेळ खूप असावा,
तुझ्याबरोबर एकही क्षण...
मग मोकळा न जावा !!
----------------------शुभांगी...

Monday, July 5, 2010

गणित

नाती आपली जपत जपत ...
शुन्यातच गुरफटून राहायचे का...
आयुष्याचे गणित करत...
असेच आपण जगायचे का...


-------------------शुभांगी...०५/११/०९
तुझ्या आठवणींचा पाउस...
जेव्हा डोळ्यातून पाझरतो...
माझ्या उरातील श्वास ...
तुझ्यापाशी घुटमळतो ...

--------------------शुभांगी...२५/०१/१०

नाते

नाते तुझे नि माझे…
नकळत पणे जुळलेले…
नाते तुझे नि माझे …
शब्दातच गुंतलेले …

-------------शुभांगी...१५/०६/१०

Saturday, April 24, 2010

नकळत...
.
.
.

नकळत डोळ्यातील अश्रू आले खाली
अश्रूंची मग त्या ना कधीच फुले झाली ...

नकळत ओंजळीतली फुले खाली पडली
त्या फुलांना कधी का इजा नाही झाली ...

नकळत श्वासातून श्वास असा मिसळला
फक्त मलाच त्याची तेव्हा जाणीव झाली...

कसे सांगू तुला भावना माझ्या या मनातली
तुला सांगता सांगता ती मनातच राहिली ...

केव्हा तरी तुला कळेल श्वासातले जंतर
पूसशील मग तेव्हा कधी मिटले हे अंतर...

----------------------------शुभांगी...२१/०४/१०

Friday, April 16, 2010

श्वास...

अशी उधळावी शब्दांची फुले
ओंजळीत मावतील तशी
प्रत्येकाने गोळा करावीत
आणि घालावी तुझ्या ओटीत...

सुख ही असेच उधळावे
भरभरून तुझ्या वरून
क्षण वेचताना सुखाचे
दमशील तू गोळा करून...

कधी न दिसावे दुख तुला
याची काळजी घेईन मी
नयनी येत अश्रू तुझ्या
ओठांनी टिपेन मी...

ठेवशील राणी असाच
शेवटपर्यंत विश्वास
जोपर्यंत राहील जगी
तुझा माझा श्वास ...

----------शुभांगी...
२३/११/०९

Sunday, January 31, 2010

का नाही भेटलीस तू मला ?


का नाही भेटलीस तू मला ?

बस इतकच विचारलस?

असे तरी विचारायचे
या आधी का नाही भेटलीस ?

मी तर तुझीच वाट पाहत होते
तू यावे अन मला घेउन जावे

पण तुझे शब्द कधी एकलेच नाही
माझे कधी ओठावर आलेच नाही

मला माहित आहे ....

तू वाट पाहिलीस मी कधी विचारते
मी वाट पाहिली तू कधी सांगतोस ...

वेळ अशीच निघून गेली...
आयुष्याची संध्याकाळ...
.
.
.
.
कधीच जवळ आली...

---------------------------शुभांगी...२६/०१/१०

Tuesday, January 19, 2010

पाहिले न मी तुला

पाहिले न मी तुला
कुठल्याच वळणावर
जळत राहिले तरीही
आयुष्याच्या सरणावर

वाटले होते मला
कधी तरी भेटशील
तुझ्या जीवनात
सामावून घेशील

खुप वाट पाहिली
कधीतरी येशील
गेल्या क्षणांचा
आठव देशील

नाही आलाच कधी
बहर वसंताचा
तेवत ठेवला आहे
दिवा मनाचा

--------------------शुभांगी...१३/०१/१०

जेंव्हा तुला मी प्रथम पाहीले......

जेंव्हा तुला मी प्रथम पाहीले......
मी माझा राहिलोच नाही...

अन मग सुरु झाले एक विचार चक्र
कुठे राहतेस ,कशी राहतेस , काय करतेस .....असंख्य प्रश्न

कधी वाटते फ़क्त माझ्याच साठी इथे असतेस
तर कधी वाटते तू मला ओळखतही नाहीस
तू येशील म्हणून अनेक वेळ मी इथेच रेंगाळत असतो

कधी पारावर तर कधी मंदिराच्या धक्क्यावर
कधी सकाळी तर कधी सायंकाळी क्वचित कधी मध्यान्ही

दिसतेस केव्हा तरी अवचित आल्या सरी सारखी..
जातेस आपल्याच धुंदीत अवखळ लाटेसारखी...
मागे वलुन देखिल पाहत नाहीस ....
मी तिथेच उभा असतो ...
निश्चल...

कारण तू मला ओळख़तच नाहीस....

दमलोय आता तुझी वाट पाहून
पण हरलो नाही अजुन
केव्हा तरी जाणवेल तुला
माझे तिथे असणे
जाताना पाहून तुला
नुसतेच हसणे...

-----------------------शुभांगी...१९/०१/१०

होई का असे तुला स्मरता......


होई का असे तुला स्मरताना...
नयनांचे डोह हे पाझरताना ...

वाटे असे पंख लेवुनी यावे..
तुझ्या सवे हे मन रिझवावे ...

एकांतातल्या मधुर क्षणांची...
आठव यावी तुज स्मरताना...

थवा पाखरांचा जाईल घरा...
नेईल मला तुजकडे तो वारा...

मिठीतल्या तव उत्कटतेला...
मी अनुभवावे तुज स्मरताना...

----------------------------शुभांगी...०७/१२/०९