मी माझा राहिलोच नाही...
अन मग सुरु झाले एक विचार चक्र
कुठे राहतेस ,कशी राहतेस , काय करतेस .....असंख्य प्रश्न
कधी वाटते फ़क्त माझ्याच साठी इथे असतेस
तर कधी वाटते तू मला ओळखतही नाहीस
तू येशील म्हणून अनेक वेळ मी इथेच रेंगाळत असतो
कधी पारावर तर कधी मंदिराच्या धक्क्यावर
कधी सकाळी तर कधी सायंकाळी क्वचित कधी मध्यान्ही
दिसतेस केव्हा तरी अवचित आल्या सरी सारखी..
जातेस आपल्याच धुंदीत अवखळ लाटेसारखी...
मागे वलुन देखिल पाहत नाहीस ....
मी तिथेच उभा असतो ...
निश्चल...
कारण तू मला ओळख़तच नाहीस....
दमलोय आता तुझी वाट पाहून
पण हरलो नाही अजुन
केव्हा तरी जाणवेल तुला
माझे तिथे असणे
जाताना पाहून तुला
नुसतेच हसणे...
-----------------------शुभांगी...१९/०१/१०
excellent
ReplyDelete