कुठे तरी आपल्यावर नकळत कुणी झुरते आहे
हे जाणून घेणे म्हणजे प्रेम...
आपला एक शब्द ऐकण्यासाठी
कुणाचे तळमळणे जाणवणे म्हणजे प्रेम..
एकमेकांवर असलेल्या प्रेमाचा
जाहीरपणे बोभाटा न करणे म्हणजेच प्रेम...
कधी हसू आणि कधी आसू या संभ्रमात
मैत्रीच्या नात्याला वाढवणे म्हणजेच प्रेम...
आणि कधीतरी आपल्या प्रेमाला पालवी फुटेल
या आशेवर आनंदात जगणे म्हणजेच प्रेम...
---------शुभांगी...१४/०२/११
No comments:
Post a Comment