तुझ्या माझ्यातल नातं ,
किती खरं किती खोटं ,
कधी बाळपण अल्लड ,
कधी स्वप्नातलं गीत छोटं...
तुझ्या माझ्यातल नातं ,
कसे कधी कळावे कुणा ,
कधी यौवन सळसळतं ,
राहिलेल्या पाउलखुणा...
तुझ्या माझ्यातल नातं ,
आता उरलं उरलं,
त्याला जनमानसात ,
जिवापल्याड जपलं...
तुझ्या माझ्यातल नातं ,
किती मनात ठेवलं
जसं आभाळ बरसतं
तसं नेत्री ओघळलं...
तुझ्या माझ्यातल नातं ,
त्याला काय देऊ नाव
तुझ्या माझ्या विचारांत
वसलेलं एकच गाव...
------- शुभांगी...२७/०८/११
Friday, September 9, 2011
Wednesday, July 13, 2011
निळी निळी शाई...
निळी निळी शाई.. हात रंगवून जाई..
तेव्हा मात्र मला तिचीच आठवण येई ..
गोरी,गोंडस,गोबऱ्या गालाची..
अगदी माझ्या बाजूला बसायची...
लिहिता लिहिता नेहमी हातावर माझेच नाव लिहायची..
निळी निळी शाई.. हात रंगवून जाई..
तेव्हा मात्र मला तिचीच आठवण येई ..
कडक इस्त्रीचे कपडे घालून ..
दोन वेण्या छानदार घालून ..
चालायची नेहमी मानेला लटका झटका देऊन..
निळी निळी शाई.. हात रंगवून जाई..
तेव्हा मात्र मला तिचीच आठवण येई ..
सवय होती तिला हसायची..
नेमकी त्याचीच भुरळ पडायची ..
काय माहित ती सुध्धा का माझ्यावर मरायची..??
निळी निळी शाई.. हात रंगवून जाई..
तेव्हा मात्र मला तिचीच आठवण येई ..
शाळा संपली आणि लक्षात आले..
भेट आता कधी व्हायची नाही..
जाता जाता म्हणाली मनावर नाव गोंदले आहे ...
हातावरचे पुसून जाईल ...
निळी निळी शाई.. हात रंगवून जाईल ..
तेव्हा मात्र मला तुझीच आठवण येईल ..
---------शुभांगी...०१/११/०९
तेव्हा मात्र मला तिचीच आठवण येई ..
गोरी,गोंडस,गोबऱ्या गालाची..
अगदी माझ्या बाजूला बसायची...
लिहिता लिहिता नेहमी हातावर माझेच नाव लिहायची..
निळी निळी शाई.. हात रंगवून जाई..
तेव्हा मात्र मला तिचीच आठवण येई ..
कडक इस्त्रीचे कपडे घालून ..
दोन वेण्या छानदार घालून ..
चालायची नेहमी मानेला लटका झटका देऊन..
निळी निळी शाई.. हात रंगवून जाई..
तेव्हा मात्र मला तिचीच आठवण येई ..
सवय होती तिला हसायची..
नेमकी त्याचीच भुरळ पडायची ..
काय माहित ती सुध्धा का माझ्यावर मरायची..??
निळी निळी शाई.. हात रंगवून जाई..
तेव्हा मात्र मला तिचीच आठवण येई ..
शाळा संपली आणि लक्षात आले..
भेट आता कधी व्हायची नाही..
जाता जाता म्हणाली मनावर नाव गोंदले आहे ...
हातावरचे पुसून जाईल ...
निळी निळी शाई.. हात रंगवून जाईल ..
तेव्हा मात्र मला तुझीच आठवण येईल ..
---------शुभांगी...०१/११/०९
Wednesday, June 29, 2011
Monday, June 27, 2011
तूचआहेस..

तुझ्या असण्याने दरवळतो,
सुगंध रातराणीचा,
आणि नसण्याने
भास काटेरी बाभळीचा...
तू एक नक्षत्र,
माळरानावर दिसणारे..
जवळ भासणारे,
पण नभांगणात असणारे..
तू आहेस पाऊस,
चिंब भिजवणारा..
कधी झरझर,
अश्रुंतून बरसणारा..
तूच आहेस तो श्वास,
जीवन देणारा...
कधी गंधाळलेला,
मोगरा माळलेला..
क्षणात बरसणारा,
प्रीतीचा फुलोरा..
तूच आहेस मोरपंखी..
स्वप्नांचा पिसारा...
------शुभांगी... २७/०६/११
अनामिक हुरहुर
आज परत तिची आठवण,
अनामिक हुरहुर लावून गेली,
मनाच्या कप्प्यातील साठवण,
परत खपली काढून गेली....
--------शुभांगी...१३/०६/११
अनामिक हुरहुर लावून गेली,
मनाच्या कप्प्यातील साठवण,
परत खपली काढून गेली....
--------शुभांगी...१३/०६/११
तरंग
रंगीत शब्दांच्या ,
भावनांना जपावे,
तरंगावर स्वप्नांच्या,
अलगदच उतरावे...
---------शुभांगी...१२/०६/११
भावनांना जपावे,
तरंगावर स्वप्नांच्या,
अलगदच उतरावे...
---------शुभांगी...१२/०६/११
उधळण.
शब्द कसे खेळावे आपण,
शब्द कसे लिहावे आपण,
भावनांची करून मिसळण,
शब्दांची होऊ द्यावी उधळण...
-------------शुभांगी...
शब्द कसे लिहावे आपण,
भावनांची करून मिसळण,
शब्दांची होऊ द्यावी उधळण...
-------------शुभांगी...
विरह
तुला जळताना पाहून,
काळीज विरघळतय,
प्रेमाचे घाव सोसून,
विरहात होरपळतय...!!
--------शुभांगी... ०४/०६/११
काळीज विरघळतय,
प्रेमाचे घाव सोसून,
विरहात होरपळतय...!!
--------शुभांगी... ०४/०६/११
नकळत
नकळत तुझी आठवण येते,
पावसातल्या चिंब क्षणी,
ओलेते मन धावत जाते,
सरसर येई डोळा पाणी...!!
---------शुभांगी...०२/०६/११
पावसातल्या चिंब क्षणी,
ओलेते मन धावत जाते,
सरसर येई डोळा पाणी...!!
---------शुभांगी...०२/०६/११
शब्द
कवितेतला प्रत्येक शब्द
नकळत जगतेय मी...
मनीच्या विचारांना साद
अप्रत्यक्ष घालतेय मी...
..............शुभांगी...२६/०५/११
नकळत जगतेय मी...
मनीच्या विचारांना साद
अप्रत्यक्ष घालतेय मी...
..............शुभांगी...२६/०५/११
आठवतेय आज
आज आठवतेय ते माझे हसणे,
घरासमोरच्या धक्क्यावर बसणे,
तुला भेटण्याचे ते रम्य बहाणे,
भेटले नाही कि उगीचच रुसणे...
----------शुभांगी...१५/०५/११
घरासमोरच्या धक्क्यावर बसणे,
तुला भेटण्याचे ते रम्य बहाणे,
भेटले नाही कि उगीचच रुसणे...
----------शुभांगी...१५/०५/११
:(
ज्या क्षणी आपल्या या नात्याला नाव दिले,
खरे सांगते तेव्हाच त्या
नात्याचे फुलणे संपले...
______शुभांगी
खरे सांगते तेव्हाच त्या
नात्याचे फुलणे संपले...
______शुभांगी
भावना
भावना मनात रुजलेली
नकळत अश्रूत भिजलेली
प्रीत माझी कशी अजूनही
माझ्यावर रुसलेली....
--------------शुभांगी...११/०४/२०११
नकळत अश्रूत भिजलेली
प्रीत माझी कशी अजूनही
माझ्यावर रुसलेली....
--------------शुभांगी...११/०४/२०११
हे फक्त तुझ्यासाठीच...

कुठे तरी आपल्यावर नकळत कुणी झुरते आहे
हे जाणून घेणे म्हणजे प्रेम...
आपला एक शब्द ऐकण्यासाठी
कुणाचे तळमळणे जाणवणे म्हणजे प्रेम..
एकमेकांवर असलेल्या प्रेमाचा
जाहीरपणे बोभाटा न करणे म्हणजेच प्रेम...
कधी हसू आणि कधी आसू या संभ्रमात
मैत्रीच्या नात्याला वाढवणे म्हणजेच प्रेम...
आणि कधीतरी आपल्या प्रेमाला पालवी फुटेल
या आशेवर आनंदात जगणे म्हणजेच प्रेम...
---------शुभांगी...१४/०२/११
क्षणात मी
क्षणात मी अन क्षणात तू
कधी कुणी ओळखले नाही..
मनात मी अन मनात तू ...
गुंता कधीच सुटला नाही...
----------शुभांगी...१०/०२/११
कधी कुणी ओळखले नाही..
मनात मी अन मनात तू ...
गुंता कधीच सुटला नाही...
----------शुभांगी...१०/०२/११
वागणं..
जर माझं मूक राहणं,
खरंच तुला सलतं,
मग तुझं तसलं वागणं,
मला किती रे खटकतं...
----------शुभांगी...२७/०१/११
खरंच तुला सलतं,
मग तुझं तसलं वागणं,
मला किती रे खटकतं...
----------शुभांगी...२७/०१/११
सागर
पाहत राहिले ना सागराकडे
कि तो मला खुणावतो,
धावत ये माझ्याकडे,
म्हणे तुला सामावून घेतो!!
----------शुभांगी...०४/०१/११
कि तो मला खुणावतो,
धावत ये माझ्याकडे,
म्हणे तुला सामावून घेतो!!
----------शुभांगी...०४/०१/११
अबोल
अबोल झाले शब्द माझे,
नयनांतून पाझरले ,
भूतकाळातल्या आयुष्याचे,
गणित पुन्हा मांडले !!
--------शुभांगी...०५/०१/११
नयनांतून पाझरले ,
भूतकाळातल्या आयुष्याचे,
गणित पुन्हा मांडले !!
--------शुभांगी...०५/०१/११
चार ओळी...
कागदावर साठलेल्या चार ओळी...
माहित आहे पुढे काय करतात ....
कधीतरी वाचताना मग त्या...
डोळ्यातुन झरझर बरसतात...
-----शुभांगी...
माहित आहे पुढे काय करतात ....
कधीतरी वाचताना मग त्या...
डोळ्यातुन झरझर बरसतात...
-----शुभांगी...
Thursday, March 3, 2011
Wednesday, March 2, 2011
Subscribe to:
Posts (Atom)