Thursday, September 6, 2018

तुझी कल्पना ....

समुद्रकिनारी  जेव्हा  वाळूवर  पाय  ठेवशील 
नेमका  त्याच  क्षणी  मी  तुझा  हात  धरून  म्हणेन ..
चल ना आपण  पाण्यात  उभे  राहूया .... ?
बघ  तेव्हा  नेमके  तुलाही  असेच  वाटेल ...

नजरेला  भिडेल  ना  जेव्हा नजर  तेव्हा  साऱ्या  जगाचा  विसर  पडेल ,
मग  तिथेच  वाळूवर  बस  तू , अन  मी  तुझ्या  मांडीवर  डोके  ठेवून ..
अनेक  वर्षांचे  राहिलेले  संवाद  आपल्या  नजरेने  मांडेन..
आणि  मग  काही  क्षण  चांदण्याच्या  बरसातीने  तुला  तृप्त  करेन ..

तुला  लाजताना  पाहून  मग मी  ही  मनोमन  सुखावेन ..
ह्यालाच  म्हणतात ना  प्रेम  असे  हळूच  कानात  कुजबुजेन..
तू  हातानी  झाकून  घेतलेला  चंद्र  हळूच  पहायचा  प्रयत्न  करेन ..
आणि  पुढे  काय  घडेल  या  फक्त  विचाराने  शहारेन..

तू  ही मग  माझ्या  खांद्यावर डोके  ठेवशील  अलगदपणे ,
आपल्या  दोघांचे  हात  एकमेकात  गुंफले  जातील  नकळतपणे ,
जन्मजन्मांतरीचे  नाते  असेच  उलगडत  जाईल  हळुवारपणे ,
आणि  जीवनाला  एक  नवा  अर्थ  प्राप्त  होईल  फक्त...  तुझ्याच  स्पर्शाने ...

Shubhangi Sawant
06/09/2012
अंगणातला पारिजात
सुगंधाने बहरला
माझ्या धुंद श्वासात
नकळतपणे मिसळला ..
---------------शुभांगी...२२/०२/११

Friday, September 9, 2011

नाते तुझे नि माझे..

तुझ्या माझ्यातल नातं ,

किती खरं किती खोटं ,

कधी बाळपण अल्लड ,

कधी स्वप्नातलं गीत छोटं...



तुझ्या माझ्यातल नातं ,

कसे कधी कळावे कुणा ,

कधी यौवन सळसळतं ,

राहिलेल्या पाउलखुणा...



तुझ्या माझ्यातल नातं ,

आता उरलं उरलं,

त्याला जनमानसात ,

जिवापल्याड जपलं...



तुझ्या माझ्यातल नातं ,

किती मनात ठेवलं

जसं आभाळ बरसतं

तसं नेत्री ओघळलं...



तुझ्या माझ्यातल नातं ,

त्याला काय देऊ नाव

तुझ्या माझ्या विचारांत

वसलेलं एकच गाव...



------- शुभांगी...२७/०८/११

Wednesday, July 13, 2011

निळी निळी शाई...

निळी निळी शाई.. हात रंगवून जाई..

तेव्हा मात्र मला तिचीच आठवण येई ..



गोरी,गोंडस,गोबऱ्या गालाची..

अगदी माझ्या बाजूला बसायची...

लिहिता लिहिता नेहमी हातावर माझेच नाव लिहायची..



निळी निळी शाई.. हात रंगवून जाई..

तेव्हा मात्र मला तिचीच आठवण येई ..



कडक इस्त्रीचे कपडे घालून ..

दोन वेण्या छानदार घालून ..

चालायची नेहमी मानेला लटका झटका देऊन..



निळी निळी शाई.. हात रंगवून जाई..

तेव्हा मात्र मला तिचीच आठवण येई ..



सवय होती तिला हसायची..

नेमकी त्याचीच भुरळ पडायची ..

काय माहित ती सुध्धा का माझ्यावर मरायची..??



निळी निळी शाई.. हात रंगवून जाई..

तेव्हा मात्र मला तिचीच आठवण येई ..



शाळा संपली आणि लक्षात आले..

भेट आता कधी व्हायची नाही..

जाता जाता म्हणाली मनावर नाव गोंदले आहे ...

हातावरचे पुसून जाईल ...



निळी निळी शाई.. हात रंगवून जाईल ..

तेव्हा मात्र मला तुझीच आठवण येईल ..





---------शुभांगी...०१/११/०९

Wednesday, June 29, 2011

विश्व

तूच माझे विश्व ,
आणि तूच कल्पना,
जरा येतोस बरोबर,
मग माझा जीव रमेल ना...
-----शुभांगी...२९/०६/११

Monday, June 27, 2011

तूचआहेस..




तुझ्या असण्याने दरवळतो,
सुगंध रातराणीचा,
आणि नसण्याने
भास काटेरी बाभळीचा...

तू एक नक्षत्र,
माळरानावर दिसणारे..
जवळ भासणारे,
पण नभांगणात असणारे..

तू आहेस पाऊस,
चिंब भिजवणारा..
कधी झरझर,
अश्रुंतून बरसणारा..

तूच आहेस तो श्वास,
जीवन देणारा...
कधी गंधाळलेला,
मोगरा माळलेला..

क्षणात बरसणारा,
प्रीतीचा फुलोरा..
तूच आहेस मोरपंखी..
स्वप्नांचा पिसारा...

------शुभांगी... २७/०६/११

डायरी

डायरीच्या पानावर,
ओळखीचा मजकूर,
मग नियतीचा वार,
का बरे असा क्रूर ....?
-------शुभांगी...१७/०६/११