Saturday, October 24, 2009

वाट पाहतोय तो.


अशीच एकदा बसले होते ...
विचारीत माझ्या मनाला ...
सांग असे काय घडले की...
आठवण त्याची नाही तुला...

अजुन असाच झुरतोय तो...
क्षणाक्षणाला विझतोय तो...
तुझ्या प्रीतिचा दिवा लावून ...
जन्म जन्म जळतोय तो...

तू मागे परतून बघ ...
तिथेच तो उभा आहे...
तुझ्या येण्याची आस आहे...
म्हणुन वाट पाहतोय तो...

_____________________शुभांगी...
२४/०९/०९ ...

आठवण माझी...

आठवण माझी तुला येते..?
प्रश्न आहे हा मोठा गहन..
अरे पण ती येण्यासाठी...
निघुनच का बरे जाते..?

-----------------------------------शुभांगी ...२२/१०/०९

Thursday, October 22, 2009

उदासीन मनाला


उदासीन मनाला
केव्हातरी समजायला हवे...
असेच एकटे राहणे
का त्याला सोसायचे...?
-----------------------शुभांगी ...२२/१०/०९

Saturday, October 10, 2009

साक्ष

साक्ष पटावी कोणाची ...
ज्याला मैत्री कळत नाही...
विश्वास असतो सापेक्ष ..
निरर्थक असते साक्ष....

----------------------------शुभांगी...१०/१०/०९

नाते

खरच कसे हे नाते जुळले..
माझे मलाच नाही कळले...
तू मला अन मी तुला ...
जन्मोजन्मीचे ओळखले...

--------------------------शुभा
ंगी...१०/१०/०९

क्षितिज

नाते तुझे नि माझे ..
का देऊ नाव त्याला ...
आहे असेच की ते जसे...
क्षितिज म्हणू का मी त्याला...
------------------------------शुभांगी...१०/१०/०९

नाही मी फुलपाखरू

नाही मी फुलपाखरू ...
नाही मी लता-तरु ....
मी अशीच एक बिजली ..
कधी तरी तुला दिसेन..
तुझ्या मनावर अशी ठसेन..
तुला क्षणक्षण अशी आठवेन....

-----------------------------शुभांगी...१०/१०/०९

सरिता

मी सरिता अशी शांत...
धुन्ध सागर तो प्रशांत...
मिलन माझे त्याच्याशी..
जरी तो कधी अशांत....

------------------------शुभांगी...१०/१०/०९


सागराच्या लाटा...

सागराच्या लाटा...
फेसाळत येती..
पोटामधले गुपित ...
किनार्यावर आणती ...

---------------------------शुभांगी...१०/१०/०९

Friday, October 9, 2009

आठवणी

आठवणीच्या हिंदोल्यावर
मन झुलते झुलते
एकेक पान उलगड़ताना
एकेक पाखरू फडफडते ....
_______________________शुभांगी ...

Thursday, October 8, 2009

शब्द

शब्द मोत्यांसारखे असतात
म्हणून कसेही माळायचे नसतात....
शब्दांच्या ओळी होतांना,
शब्दांचे अर्थ सांडायचे नसतात!!
_________________________शुभांगी ...




नि:शब्द तू राहू नको..
माझे तुला हे सांगणे.....
मनाला ही बांधू नको...
निर्मल असू दे वागणे...

_________________________शुभांगी ...

काय झाले माझे मलाच कळेना
शब्द अडकले ओठातच...
मन लागले भरकटु
ताब्यात ते येइचना....
_____________________शुभांगी...




शब्द बांधूच नयेत मुळी
असे कसे तू बोलावे..
असते बंधन मनाचे..
जे शब्दांमधून जाणवते....
_______________________शुभांगी



Wednesday, October 7, 2009

मी

मीच होते येसुबाई , मीच होते ताराऊ,
होते मीच आनंदीबाई
आणी मीच होते लक्ष्मीबाई ,
इतके सगळे करूनही ...
मी शेवटी अशीच राहिले ..
मीच उभारला राष्ट्र स्थापनेचा झेंडा ..
मलाच होती चीड ..
असत्याची ,पराधीनतेची,..
हीच का ती मी ?

अजूनही मी अशीच आहे..
स्त्री मुक्तीची आंदोलने करीत आहे ..
माझ्या मुक्तीसाठी ..
मीच अशी झटते आहे ..

गांजलेली ,रंजलेली , मी ...
कुणास ठाउक कशी..
पण उभी आहे ..

-- ____________________शुभांगी