Friday, December 18, 2009

माझे बंडखोर मन...

असंच चालत आलाय जगात
कुणीतरी माघार घ्यायची .....
पण अजूनही काळात नाही
ती व्यक्ती स्त्रीच का असते?

तिचं मन ...कुणाला वाटले ठेवावे ...
कुणाला वाटले मोडावे...
इतके का ते तकलादू असते..?
कुणीही ठेवून मोडण्यासारखं..?

प्रश्न सारखेच भेडसावत असतात ....
सूर्योदय ते सूर्यास्त ...
आज , उद्या ,परवा
या वर्षी ,पुढच्या वर्षी आणि पुढेही ....
या प्रश्नांचे उत्तरं...
कधीच मिळणार नाहीत .

हे तिने केलेच पाहिजे ..
अमकं कर , तमक करू नको...
ही जबाबदारी कुणाची ?
प्रेम ,त्याग ,अश्रू , पूजा , सेवा,मनोरंजन...
हे देखील तिनेच करावं...?
का ? कुणासाठी ?कशासाठी?

आयुष्याच्या उतारावरून
एकट्याने जायचे भीती वाटते म्हणून...?
की रणरणत्या वाळूत एखादी सावली असावी म्हणून..?
की तिला कुणी अश्राप , निराधार ,अबला म्हणू नये म्हणून...?

---------------------------------------------शुभांगी...२५/११/०९